हा किल्ला ३ ते ४ मजली आहे.या किल्याची उंची दोनशे फुट उंची पेक्षा जास्त आहे. किल्ल्याच्या चार बाजूस भक्कम असे कोट बांधलेले आहे. या किल्ल्यात गणपती, महादेव, आसरा, म्हसोबा, खंडेराव, देवी यांच्या मूर्ती आहे. तर मस्जीद सारखी वास्तू सुद्धा आहे. किल्ल्यामध्ये घोडे, उंट, गाई, बैल, जनावरे बांधण्यासाठी मोठा गोठा आहे. असे म्हणतात कि राजा खोजा घोड्यांचा व्यापार करीत असे त्याच्याकडे अनेक तगडे घोडे होते पुर्वीच्या राजांचे थकलेले घोडे घेऊन त्यांना नवीन तगडे घोडे खोजा पुरवीत असे. या किल्ल्यात एक पायविहीर आहे विहिरीच्या वरील भागात न्हाणीघर (बाथरूम) असून त्याचे दगडी काम पाहण्यासारखे आहे. भग्नावस्थेतील महादेवाचे मंदिराचे दगडी काम सुरेख असून कारागिरीचा एक आविष्कार आहे. या किल्ल्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्याची खूप पडझड झालेली आहे. आजही या किल्ल्याला भेट दिल्यास या किल्ल्याचे गत काळातील वैभव समजून येईल.
महाराष्ट्र शासनाने हा किल्ला ताब्यात घेऊन डागडुजी केल्यास धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यास पर्यटकांची खूप गर्दी होईल यात शंका नाही.
किल्ल्यामध्ये असलेल्या पाय विहिरीत कमळाच्या फुलासारखे दिसणारे ‘दवणे’ नावाची फुले दमा या रोगावर उपयुक्त असल्याचे सांगतात.