किल्ले नस्तनपूर व कथा खोजा नाईकाची

नस्तनपूर या क्षेत्राला धार्मिक क्षेत्राबरोबर ऐतिहासिक महत्व आहे या ठिकाणी खोजा नामक राजा होऊन गेला या राजाने येथे किल्ला बांधला आहे या किल्ल्याबाबत दंतकथा अशी

नस्तनपूर या ठिकाणी पूर्वी भिल्ल समाजाची खूप वस्ती होती त्यात खोजा नाईक हा भिल्ल होता तो शेत मजुरी करून आपला उदर निर्वाह करीत असे शेती करता करता तो शनि महाराजांचा निस्सीम भक्त झाला. एकदा हा खोजा शेत नांगरत असताना त्याचे नांगराचे फाळाला परिसाचा स्पर्श झाल्याने संपूर्ण नांगर सोन्यासारखे चमकू लागले त्याला खूप आनंद झाला. त्याचेकडे अमाप संपती झाल्याने त्याने स्वरक्षणासाठी येथे भुईकोट किल्ला बांधला या किल्ल्यावरून त्याला “ दिल्लीचा दिवा” बघण्याची इच्छा होती या किल्ल्याला त्याने चारी बाजूने भक्कम असा कोट बांधला.

पुढे सन १८०० साली मुंबई ते भुसावळ मध्य रेल्वेचे काम सुरु झाले.या कोटामधून रेल्वेलाईन टाकण्याचे काम सुरु झाले त्यास खोजाने विरोध केला तरी सुद्धा इंग्रजांनी कोट पाडून रूळ टाकण्यास सुरवात केली खोजाने रूळ काढून टाकले व परत कोट बांधला असे बऱ्याच वेळा झाल्यानंतर इंग्रज सरकारला त्याने आवाहन केले कि,‘मुंबई ते भुसावळ एक रूळ मी सोन्याचा बनवितो दुसरा रूळ तुम्ही सोन्याचा बनवा’ हे ऐकून इंग्रज सरकारला त्याचे संपत्ती विषयी संशय निर्माण झाला म्हणून त्यांनी खोजास पकडण्याचे ठरविले खूप प्रयत्न करून खोजा इंग्रजाच्या हाती लागला नाही .एकदा त्याचा खूप पाठलाग झाल्यावर त्याने किल्ल्यातील एका विहिरीत बायका मुलांसह संपत्तीसह घोडयावरून उडी घेतली व इंग्रजाच्या हातावर तुरी देऊन राजा खोजा फरार झाला नंतर इंग्रजांनी ती विहीर बघितली असता त्या विहिरीत एक मोठे भुयार आढळले त्या भुयाराची लांबी १२ खाटांचे सुंब म्हणजेच १२ खाटा विणण्यासाठी जेवढा दोर लागते तेवढ्या लांबी चे भुयार आढळले आहे.