नस्तनपूर कसे याल

श्री क्षेत्र नस्तनपूर ता. नांदगांव जि. नासिक हे ठीकाण श्री शनिदेवांचे “स्वयंभू जाज्वल्य” व प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेले असे प्राचीन स्थान आहे. नांदगांव चाळीसगांव रस्त्यावर नांदगांव पासून १८ कि.मी. अंतरावर आहे. तर नांदगांव औरंगाबाद रोडने नांदगांव पासून ९ कि.मी. अंतरावर चाळीसगांव फाटा लागतो. त्या ठिकाणी शनि देवस्थानाने लावलेली भव्य कमान आपले स्वागत करते.

कमानीपासून ९ कि.मी. आत गेल्यास श्री क्षेत्र नस्तनपूर हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी चाळीसगाव-नांदगाव येथून बसने जाता येते. खाजगी गाड्याची सुद्धा सुविधा आहे. मनमाड-भुसावळ या रेल्वे जंक्शन दरम्यान हे स्थान आहे. पिंपरखेड व न्यायडोंगरी या स्टेशनवर पँसेंजर गाडीने उतरून नस्तनपुरास जाता येते. नांदगाव,मालेगाव,चाळीसगाव,नाशिक येथून श्री क्षेत्र नस्तनपूर पर्यंत थेट बस आहे. जाण्यासाठी पक्का रस्ता (डांबरी रोड)आहे.

संपर्क फॉर्म

कार्यालय

श्री शनीमहाराज मंदिर नस्तनपूर,पो.परधाडी,ता.नांदगाव,
          जिल्हा-नाशिक(महाराष्ट्र)

(०२५५२) २४२९९९

shanimandirnastanpur@gmail.com

श्री शनि महाराजांच्या मूर्तीचे दर्शन सकाळी ०६:०० ते रात्री १०.०० या           वेळात घेता येते.