श्री शनि महाराजांच्या मूर्तीचे दर्शन
श्री शनि महाराजांच्या मूर्तीचे दर्शन मंदिर वेळात घेता येते. मूर्तीच्या दोन्ही बाजूस नंदा दीप लावलेले असतात. या ठिकाणी शनि अमावस्या, श्रावणी शनिवार वगळता अन्य दिवशी मूर्तीवर अभिषेक करता येतो. २४ तास येथे ब्राम्हण उपलब्ध असतात.
पुजेची पद्धत
मंदिरातील मूर्तीची दररोज सकाळी ८.०० वाजता पूजा, अभिषेक, नैवैद्य,आरती होते. दुपारी १२.०० वाजता नैवैद्य महाआरती, संध्याकाळी ६.०० वाजता पंचोपचार पूजा होते.