देवस्थानचे उपक्रम

भाविकांना होणारी गैरसोय दूर व्हावी म्हणून चाळीसगांव येथील सुप्रसिद्ध व्यापारी व सीताबाई मांगीलाल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नारायणभाऊ अग्रवाल (चाळीसगांव) यांनी एक लक्ष पंचवीस हजाराची भांडी दिली व पन्हाळी पोलादी पत्रे भेट दिले.

पाच देणगी पेट्या असून महिन्यातील दर सोमवारी व शनि अमावस्येनंतर पेट्या उघडल्या जातात त्या वेळी संस्थेचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित असतात.

संस्थांनाची १० एकर जागा असून त्यामध्ये मंदिर, ३ मोठे प्रसादालय, अभिषेक भवन, संस्थान कार्यालय, भव्य भक्त निवास, निसर्गरम्य बगीचा, वाहनतळ, विहीर इ. आहेत.

व्यापारी संकुल उभारण्यात आलेले आहे.

भविष्यातील उपक्रम

संस्थांनाने श्री क्षेत्र मंदिर परीसरालगतच्या १२ एकर जमिनीची खरेदी केली आहे. या जागेत विकास कामे टप्पा क्र.२ अंतर्गत पुढील विकासकामे हाती घेण्याच्या दृष्टीने विश्वस्त व्यवस्था प्रयत्नशील आहे. परिसर अधिकाधिक निसर्गरम्य करणे, परिसरातील दुर्लक्षित व वंचित घटकांसाठी विविध स्वरूपाच्या जनहिताच्या योजना राबविणे. जसे कि अद्ययावत वैद्यकीय सेवा, शिक्षण, सामाजिक, ज्येष्ठ नागरिक व अपंग, विद्यार्थी, महिला, साहित्य, कला, क्रीडा, या घटकांसाठी तसेच आदिवासी व मागासवर्गीयांसाठी उपक्रम राबविणे.