खोजा राजा खूप धार्मिक होता असे किल्ल्याचे भोवताली असलेल्या देवदेवतांवरून आपल्या लक्षात येते. या किल्ल्याचे बांधकामास सुरवात करण्यापूर्वी खोजाने गणपतीची स्थापना केली, हा गणेश आज भाविकांमध्ये ‘वास्तू गणेश’ म्हणून ओळखला जातो. किल्ल्याच्या पडझडमुळे ही गणेशमूर्ती मातीत दाबली गेली होती सुमारे ३० – ३५ वर्षापूर्वी हा गणपती भाविकांना आढळला. हा गणपती नवसाला पावतो असा भाविकांचा अनुभव आहे, या गणपतीचे सलग पाच बुधवार दर्शन घेतल्यास आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात असा गणेश भक्तांत विश्वास आहे.
ना आक्रमण ना नैसर्गिक आपत्ती ही आहे शनिदेवाची कीर्ती महाराष्ट्रातील विविध देवालयांवर वेगवेगळ्या राजांनी आक्रमण केल्याच्या घटना आहेत परंतु शनिमहाराजांचे हे देवस्थान इतके जागृत आहे कि, या मंदिरावर आजपर्यंत कोणीही आक्रमण करण्याचे धाडस केलेले नाही.
मोठे मोठे भूकंप, ऊन, पाऊस, वारा यामुळे इतर मंदिराचे नुकसान झाल्याचे आपण ऐकतो परंतु या मंदिराला या पासून सुद्धा धोका झालेला नाही.