आख्यायिका

या क्षेत्राबाबत अनेक कथा सांगितल्या जातात दुसऱ्या या कथेत सितामाई प्रभूरामचंद्रासमवेत होत्या. त्रेतायुगात श्री प्रभुरामचंद्र लक्ष्मण व सीतेसह वनवासात जाण्यासाठी अयोध्येहून निघाले ते अरण्यवासी असतांना विश्वमित्र,वाल्मिकी ऋषीसह शिवनंदी व गंगातिरी भ्रमण करींत असताना ‘ॐ शन्नमैदेवी’ हि मंत्राक्षरे प्रकट ऐकू आल्याने भारव्दाज ऋषींनी त्यांना शिवनंदी महात्म्य सांगितले ते ऐकून तेथून त्यांनी महेशमाळ,गिरीजा,तपोवन,उमावन,वेरूळ(घृष्णेश्वर), देवगिरी, सह्याद्री पर्वतरांगांनी पाटणादेवीच्या स्थानास भेट देऊन श्री प्रभू रामचंद्र नस्तनपूर या तीर्थक्षेत्री पोहचले या नस्तनपुरचे पूर्वीचे नाव नशरथपूर असे होते.

प्रभू रामचंद्र व सर्व ऋषी मंडळी संध्या पूजा म्हणजे सूर्यास अर्ध्य देत असताना ‘वालुकारत्न मिश्रित श्री शनि महाराजाची मूर्ती ‘ त्याचे हातात प्रकट झाली, तुम्हास साडेसाती आहे शनि महाराजांची पूजा अर्चा करावी असा उपदेश ऋषीमुनीनी प्रभू रामचंद्रांना केला सिता,लक्ष्मण व सर्व ऋषींच्या संमतीने त्यांनी सूर्य मुख, अमृतकल्प शनि मूर्ती शनिवारच्या दिवशी नस्तनपूर येथे स्थापन केली त्यावेळी अवकास्य देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली अशी पुराणातील कथा आहे.