कोणत्याही मंत्राची जपसंख्या तेवीस हजार करावी.
शनिचा व्यासविरचित मंत्र
ॐ नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम !
छायामार्तंडसंभूतं तं नमामि शनैश्चरम !!
शनिचा पुराणौक्त मंत्र
सूर्य पुत्रो दीर्घ देहो विशालाक्ष: शिवप्रिय !
मन्दचार: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि: !!
ॐ शम शनेश्चराय नमः!!
शनिचा वेदोक्त मंत्र
ॐ शमग्निराग्निभी: करच्छन्न:स्तपतु सूर्य:!
शंवातोवा त्वरपा अपस्त्रिधा: !!
शनिचा तंत्रोक्त मंत्र
ॐ शं शनैश्चराय नमः
हे शनि यंत्र आपल्याजवळ नेहमी ठेवावे
जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरी ठेवा ।। आरती ओंवाळीतो । मनोभावें करुनी सेवा ।। जय ।।धृ।। सुर्यासुता शनिमुर्ती । तुझी अगाध कीर्ती ।। एकमुखे काय वर्णू । शेषा न चले स्फूर्ती ।। जय ।।१।। नवग्रहांमाजी श्रेष्ठ । पराक्रम थोर तुझा ।। ज्यावरी कृपा करीशी । होय रंकाचा राजा ।। जय ।।२।। विक्रमासारीखा हो । शककर्ता पुण्यराशी ।। गर्व धरिता शिक्षा केली । बहुत छळीयेले त्यासी ।। जय ।।३।। शंकराच्या वरदाने । गर्व रावणाने केला ।। साडेसाती येता त्यासी । समूळ नाशासी नेला ।। जय ।।४।। प्रत्यक्ष गुरुनाथा । चमत्कार दावियेला ।। नेऊनि शुळापाशी । पुन्हा सन्मान केला ।। जय ।।५।। ऐसे गुण किती गाऊ । धणी न पुरे गाता ।। कृपा करी दिनावारी महाराजा समर्था ।। जय ।।६।। दोन्हीकर जोडोनिया । रखमा लीन सदा पायी ।। प्रसाद हाची मागे । उदयकाळ सौख्य दावी ।। जय ।।७।।
सत्राणे उड्डाने हुंकार वदनी । करी डळमळ भूमंडळ सिंधुजवळ गगनी ।। काडाडीले ब्रम्हांड धाक त्रिभुवनी । सुरवरनर निशाचर त्या झाल्या पळणी ।।धृ।। जय देवा जय देवा श्रीहनुमंता । तुमचेनी प्रसादे न भिं कृतांता ।।१।। दुमदुमली पाताळे उठिला प्रतिशब्द । थरथरला धरणीधर मानिला खेद ।। काडाडीले पर्वत उड्डगणउच्छेद । रामी रामदासा शक्तीचा शोध ।।२।। जय देवा ।।
हे सिंहकापुत्र शनैश्वरा,ग्रहाराज ,रविनंदना ,दिर्घश्मश्रुजटाधरा, धनहर्ता, धनप्रद, महाबल, महाप्रभो, ग्रहेश्वरा, नक्षत्रगणनायका, ग्रहश्रेष्ठा, ग्रहसमर्था, ग्रहनाथा,शमीपुष्पप्रिया,कंठी नीलमणीधारक, तुझी ही निरनिराळी नावे घेऊन तुला प्रार्थना करतो. माझे रक्षण कर माझी पिडा दूर कर, दु:ख, क्लेश, चिंता, रोग नाहीसे कर. सुखी ठेव, अपार धन ऐश्वर्य दे. माझी मन:कामना पूर्ण कर. माझ्यावर सदैव कृपा कर.