साडेसातीच्या दुःखाणे निराश व उदासीन झालेल्या व्यक्तींनी शनि मंत्राचा अवश्य जप करावाच पण त्याबरोबर इतरही काही शनिची आराधना करावी.

एखादे ठराविक कार्यसिद्धीसाठी काळे उडीद तेलात भिजवून शनिवारी सूर्योदयापूर्वी माळरानावर फेकावेत म्हणजे शनि ग्रह शांत होतो.

शत्रू पीडा दूर होण्यासाठी काळाबिबा, काळी कोरी चिंधी, तांब्याचा पैशासह काळे तीळ, उडीद घालून मारुतीला शनिवारी अर्पण करावी.

धनप्राप्तीसाठी अथवा लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तेलाचा मारुतीवर अभिषेक करावा, त्याचप्रमाणे सत्पात्र ठिकाणी तेलाचे दान करावे.

अश्वनालाची प्रतिमा करून दर शनिवारी त्याची पूजा करावी.

मोहरीचे, तिळाचे तेल दान द्यावे.

ज्यांच्या कुंडलीत चतुर्थ स्थानी शनि असेल तर रात्री दुध पिऊ नये, काळ्या म्हशीला चारा घालावा.

षष्ठात शनि व गुरु युती असेल तर पाणी असलेला नारळ नदीत सोडवा, २८ व्या वर्षानंतर लग्न करावे व वयाच्या ४५ व्या वर्षापर्यंत स्वतःचे घर बांधू नये.

घरात लोखंडी फर्निचर वापरावे. जेवणात काळे मीठ व काळ्या मसाल्याचा वापर करावा.

दर शनिवारी उपवास करावा. शनि दर्शन घ्यावे.

पाण्याने भरलेला माठ दान करावा.

दर शनिवारी शनिस व मारुतीस रुईच्या पानांची माळ व उडीद अर्पण करावेत. याशिवाय शनि प्रदोष व्रत करावा.

शनिबरोबर मारुतीचे पूजन करण्यास फार महत्वाचे कारण आहे .मारुतीचे पूजन मारुतीची सेवा केल्याने शनिदेवाची कृपा होते. शनिच्या आराधनेत मारुतीला मोठे स्थान आहे.